केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली.अमित शाह माफी मांगोच्या घोषणा दिल्या. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शाह माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विरोधकांचा गदरोळ काही थांबत नसल्याने अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यामुळे काँग्रेससह विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी या विधानावरून अमित शाह यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने केली. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेचं कामकाज सुरू होतात. दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. जयभीमचे नारे देत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. अखेर या गोंधळातच कामकाकज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

राहुल गांधींची निदर्शने

अमित शाह यांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही या निदर्शनात सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post