माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज निधन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मनमोहन सिंग 92 वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.

रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास, फाळणीनंतर घर सोडलं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात मनमोहन यांचा जन्म झाला. दिवस होता 26 सप्टेंबर आणि वर्ष 1932.मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारली. तेव्हा मनमोहन केवळ काही महिन्यांचे होते. वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे. तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले. तिथे आजीने त्यांची चांगली काळजी घेतली, असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉ. सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी त्यांच्या The Accidental Prime Minister या पुस्तकात नमूद केलं आहे.

त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं. मनमोहन यांना उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची.गावात वीज पोहोचली नव्हती. तेव्हा मनमोहन यांनी रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला.लहानपणापासूनच ते चिकाटीनं अभ्यास करायचे. स्वभावाने शांत असलेले मनमोहन अभ्यासात मात्र फार हुशार होते.

Post a Comment

Previous Post Next Post