सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई दि.15 - परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.या प्रकरणी मारहाण करणारे जे  पोलिस जबाबदार असतील  त्यांना तात्काळ नोकरीतून बरखास्त करावे अशी मागणी  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.

कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतून बारखस्त करावे  आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सांत्वानपर 25 लाख रुपयांचा निधी द्यावा या साठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

उद्या रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर निषेध आंदोलन

परभणीतील संविधान अवमान प्रकरणी आंबेडकरी जनतेने तीव्र निषेध आंदोलन केले हे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर  पोलिसांनी बाळाचा अतिरेकी वापर करून बेदम मारहाण केली.त्यात महिलांना विद्यार्थ्यांना ही मारहाण करून अटक करण्यात आली.त्यात अटकेत असणारा कायद्याचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेल्या  मृत्यूप्रकरणी  जबाबदार पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ; परभणीत संविधानाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या सोमवार दि.16 डिसेंबर रोजी राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे आणि राज्य सरचिटणीस गौतम.सोनवणे यांनी केली.

परभणीतील संविधान अवमान प्रकरण आणि त्यानंतर च्या आंदोलनाला पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडले.पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ आणि संविधाना च्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या राज्यभर  निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन करून निषेध आंदोलन करण्यात येईल असे राजा सरवदे आणि गौतम.सोनवणे यांनी कळविले आहे.


हेमंत रणपिसे 

प्रसिद्धी प्रमुख

Post a Comment

Previous Post Next Post