प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा गुरुवारी भांडाफोड करण्यात आला.ही कारवाई महानगरपालिका , जिल्हा परिषद आणि पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पोलिस मित्र असलेला बोगस डॉक्टर आणि याच्यासह पोलिस रेकॉर्डवरील तिघांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान कोल्हापूर शहरातील बुधवार पेठ,फुलेवाडी आणि जोतिबा डोंगर येथे छापा टाकून कारवाई केली.या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने कोल्हापूर शहरात आणि उपनगरात परत एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी पोलिस मित्र असलेला बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील उर्फ डी.बी.पाटील (वय 45.रा.राजलक्ष्मीनगर ,देवकर पाणंद)गजेंद्र बापूसो कुसाळे (वय 37.रा .शिरसे ता.राधानगरी) आणि बंजरंग श्रीपती जांभिलकर (वय 31.रा.महाडिकवाडी ता.पन्हाळा) या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
देवकर पाणंद येथे पोलिस मित्र असलेला डॉ.पाटील यांने काही दिवसांपूर्वी "प्रतिक्षा "नावाने फुलेवाडी परिसरात दवाखाना चालू केला होता.या दवाखान्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य केंद्राला मिळाली असता आरोग्य विभागाने गुरुवारी त्या परिसरात छापा टाकून डॉ.पाटील याला ताब्यात घेतले.त्यानंतर पथकातील वैद्यकीय अधिकारीयांनी दवाखान्याची झडती घेतली.या झडतीत संशयास्पद काही औषधे आढ़ळली.यात कालबाहय झालेली औषधं व उत्तेजित औषधं निदर्शनास आली.त्याच प्रमाणे बनावट प्रमाणपत्रासह रिकामी इंजक्शन या पथकाच्या हाती लागल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता बुधवार पेठेतील एका भाड्याच्या खोलीत सोनोग्राफी मशीन आजच ठेवल्याची माहिती मिळाल्याने ते जप्त करण्यात आले.डॉ.पाटील यांचा जोतिबा डोंगर येथे दवाखाना असल्याची माहिती मिळाली असता तेथे छापा टाकून काही कागदपत्रे आणि औषधे सापडल्याचे सांगितले.या सर्व घडामोडी नंतर या पथकाने डॉ.पाटील यांच्यासह तिघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.