आठ महिन्यापूर्वी डोके नसलेल्या खुनाचे गुढ़ उकलले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई.




                           मयत

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-हुतात्मा पार्क येथे आठ महिन्या पूर्वी डोके नसलेल्या खुनाचे गुढ़ उकलण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून त्या मृत व्यक्तीचे नाव अशोक पाटील (रा.पिशवी ,ता.शाहुवाडी) असे आहे.त्याचा खून केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अभिषेक मंजूनाथ माळी (वय20) अतुल सुभाष शिंदे (वय 25.दोघे रा.डवरी वसाहत,यादवनगर ) आणि रंकाळा चौपाटी येथे खून झालेला रावण उर्फ अजय दगडू शिंदे (वय 25.रा.डवरी वसाहत)यांच्या सह तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी की,दि.04/04/2024 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा पार्क येथील जंयती नाल्यातील जेसीबीच्या सहाय्याने  गाळ काढ़ण्याचे काम करीत असताना चालकाला डोके नसलेले धड मिळाल्याने त्याने जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती दिली.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केला होता.त्याचा अहवाल डॉक्टरांनी शॉर्प कट असा आल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाच्या सूचना दिल्या.या पथकातील पोलिसांनी कोल्हापुर जिल्हयातील बेपत्ता व्यक्तीची माहिती या धडाच्या अंगावर असलेल्या अंडरविअरच्या कंपनी  वरुन माग काढ़त गुप्त पणे तपास चालू ठेवून आरोपीचा शोध घेत असताना डवरी वसाहत येथील रावण उर्फ अजय शिंदे यांने दोन मेव्हण्याच्या आणि इतर साथीदाराच्या मदतीने हुतात्मा पार्क मध्ये एकाचा खून करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यातील गाळात पुरल्याची माहिती मिळाली.त्याच दिवशी दि.04/04/2024 रोजी एका आरोपीचा रावण उर्फ अजय शिंदे यांचा रंकाळा चौपाटी येथे खून झाला.त्याच्या इतर साथीदारांचा माग काढत रत्नागिरी ,डवरी वसाहत आणि कंळबा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी कानावर हात ठेवले.हे सगळे खोटे बोलत असून दिशाभूल करत असल्याचे आढळून आले.त्यांच्याकडे कसून  चौकशी केली असता आरोपीनी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली.यातील अतुल शिंदे यांनी माहिती दिली की,रावणचा खून होण्याच्या अगोदर पंधरा दिवसा पूर्वी अभिषेक माळी हा हुतात्मा पार्क येथे बसला होता.त्या वेळी अभिषेक आणि मयत अशोक पाटील यांच्यात किळकोळ वाद झाल्याने अभिषेक यांने आपल्या साथीदारांना बोलावून अशोक पाटील यांच्या मानेवर एडक्याने वार करून ठार केले.त्या नंतर मृतदेह उचलून नाल्यात नेऊन ओळख पटु नये म्हणून त्याचे मुंडके कापून नाल्यात फ़ेकले व त्याच्या अंगावरील कपडे फाडुन नाल्यात फ़ेकून त्याचे धड पुलाच्या खालील गाळ्यात पुरुन तेथून गेल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी या गुन्हयांतील आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस परशुराम गुजरे,प्रविण पाटील,महेंद्र कोरवी,वैभव पाटील,विशाल खराडे,सुशील पाटील,कृष्णात पिंगळे आणि प्रदिप पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post