घरफोड्या चोरट्यास अटक.साडे पाच लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांधीनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा  दाखल गुन्हा उघडकीस आणुन या प्रकरणी संदीप नाना डोणे (वय 32.रा.डोणेवाडी तर्फ तळगांव ,ता.राधानगरी) याला अटक करून त्याच्या कडील साडेपाच लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला    कोल्हापुर जिल्हयात होत असलेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा राधानगरी तालुक्यातील डोणेवाडी येथील संदीप डोणे याने केला असून तो चोरीतील सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी आमजाई-व्हरवडे परिसरात असलेल्या स्मशानभूमी जवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळुन आली.याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने गांधीनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयांतील चोरीतील रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढ़ील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस संजय कुंभार ,विजय इंगळे,अमित सर्जे,सागर माने,कृष्णात पिंगळे,अमित मर्दाने,सुशिल पाटील,संजय पडवळ,शुभम संकपाळ आणि लखन पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post