गर्भपाताच्या 5 गोळ्यांचे पाकिटाची किंमत दोनशे पन्नास मात्र विक्री हजारात.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कोल्हापूर शहरासह उपनगरात बनावट डॉक्टरांचे पेव फुटले असून यांची मिळकत हजारात असल्याने यात एंजटांचा सुळसुळाट झाला आहे.गुरुवारी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी आणि गर्भपात करण्यारया टोळीचा भांडाफोड करून पोलिस मित्र म्हणून कार्यरत असलेल्या बनावट डॉक्टरसह त्याच्या दोन साथीदारावर कारवाई करण्यात आली.
यामुळे परत एकदा गर्भपात करीत असलेली टोळी उघडकीस आली.महाराष्ट्रात गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यास बंदी असल्याने शेजारच्या कर्नाटक राज्यात या गोळ्या मिळत असल्याने बनावट डॉक्टर या व्यवसायात पाय पसरु लागले आहेत.या गर्भपाताच्या 5 गोळ्याच्या पाकिटाची मुळ किंमंत 250/रुपये.असून त्याच गोळ्या बनावट डॉक्टर गरजूना कमीत कमी 15 हजारापासून जास्तीत जास्त 50 हजारा पर्यत होत असल्याने कमी कालावधीत हे बनावट डॉक्टर मालामाल होत आहेत यात ह्या डॉक्टरांनी काही एंजटही नेमल्याची माहिती समोर आली आहे.हे एंजट गरजू सावज हेरुन या बनावट डॉक्टर पर्यत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत.त्या बदल्यात त्यांना एका कस्टमरच्या बदल्यात तीन ते पाच हजार मिळत असल्याने त्याची काम करण्याची वृती नष्ट पावत आहे.आता पर्यत झालेल्या कारवाईत गर्भपात आणि गर्भलिंग चाचणीत बनावट डॉक्टरांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.अशा प्रकरणात कारवाई करणारयांनी त्या मुळाशी जाऊन संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी जनमानसातुन होत आहे.