मोटारसायकल चोरट्यांस अटक करून सात लाख रुपये किमंतीच्या 12 मोटारसायकल जप्त. मोटारसायकल चोरीचे बारा गुन्हे उघडकीस.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- परजिल्ह्यातील मोटारसायकल चोरटा दिपक पांडुरंग वाघमारे (वय 31.रा.चिकुर्डे ता.वाळवा जि.सांगली .सध्या रा.शिरटेकर चाळ,इस्लामपूर ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या कडील चोरीच्या सात लाख रुपये किंमतीच्या बारा मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे बारा गुन्हें उघडकीस आणले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मोटारसायकल चोरीचे गुन्हें उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना सांगली जिल्ह्यातील पोलिस रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरटा दिपक वाघमारे हा दि.13 रोजी चोरीची सप्लेंडर मोटारसायकल घेऊन शिये येथील हनुमाननगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून विना नंबर प्लेटची सप्लेंडर मोटारसायकल घेऊन आलेल्या दिपक वाघमारे याला ताब्यात घेऊन मोटारसायकल बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता ती मोटारसायकल चोरीची असून सदर बाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली .सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात बारा गुन्हें दाखल असल्याची माहिती सांगितली.सदर आरोपी कडुन चोरीच्या सात लाख रुपये किंमतीच्या बारा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.त्याच्यावर खालील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्यात लक्ष्मीपुरी- दोन ,शाहुपुरी-एक इस्लामपूर -एक ,सातारा -एक हातकंणगले - एक आणि कराड शहर पोलिस ठाण्यात- चार असे एकूण बारा गुन्हें उघडकीस आणले आहेत.

आरोपी दिपक वाघमारे याच्यावर यापूर्वी कोल्हापूर ,सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण बावीस मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस रोहित मर्दाने,रामचंद्र कोळी,संजय पडवळ,रुपेश माने,युवराज पाटील,अमित सर्जे आणि विनोद कांबळे यांच्यासह आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post