प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -- महाराष्ट्र देशात पोलीस दल सर्वोत्तम आहे. क्रिडा स्पर्धा या पोलीस दलाच्या एकता व सामर्ध्यांचे प्रतीक आहेत. खेळांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली जाते. कामाचा ताण कमी होण्यास मदत होते. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी केले. ५० व्या परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरुष व महिला याची चार बाय शंभर रिले धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये दोन्ही विभागात कोल्हापूर जिल्हा पोलीस संघाने बाजी मारली तर सातारा जिल्हा दुसऱ्या व सांगली व पुणे ग्रामीण पोलीस संघ तिसऱ्या क्रमांकावर विजयी झाले. या संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले. तसेच इतर खेळातील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वाटप केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विजयी व सहभागी संघांना सुभेच्छा देऊन त्यांचे कौतूक केले. आगामी स्पर्धेची तयारी करा अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले,पोलीसांनी त्यांचे कर्तव्य खिलाडू वृत्तीने पार पाडावे,युनिफॉर्ममधील अधिकारी व अंमलदार यांनी लोकशाही,शासनाप्रती,जनतेप्रती एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असे सांगितले.
या स्पर्धेमध्ये कोल्हापूर , सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर अशा सहा विभागातील ७७२ पुरुष व २०५ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीर व चषकाचे वाटप करण्यात आले.