प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील बीडशेड येथे असलेल्या बहिरेश्वर रोड परिसरातील यु. व्ही. निवासी अकॅडमीत शिक्षणासाठी राहिलेल्या एका अल्पवयीन मुलाशी तेथील एका कर्मचाऱ्याने गैरवर्तन केले. या प्रकरणी पिडीताच्या पालकांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता यातील संशयित प्रदीप कृष्णात नलवडे (वय ३०, रा. बीडशेड, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पिडीत मुलाला त्याच्या नातेवाईकांनी यु. व्ही. अकॅडमीत शिक्षणासाठी घातले होते. ८ डिसेंबर, २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास प्रदीप नलवडे याने पिडीत मुलास आपल्या खोलीत बोलावून त्याच्याशी गैरवर्तन केल्याने हा प्रकार मुलाने आपल्या पालकांना फोन करून माहिती दिली असता पिडीताच्या पालकानी अकॅडमीत जाऊन तेथे संशयितास जाब विचारला. त्यानंतर त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी संशयित प्रदीप नलवडे यास अटक केली आहे.याचा पुढील तपास उपनिरीक्षक नाथा गळवे करीत आहेत.
-------------
कॉलेज तरुणीची आत्महत्या.
कोल्हापुर -बोंद्रेनगर येथे गणेश पार्क परिसरातील महाविद्यालयीन 19 वर्षाच्या युवतीने रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास रहात असलेल्या घरात वरच्या मजल्यावर ओढणीने पंख्याला गळ्यात गळफास लावून घेतल्याने हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच तिच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
कॉलेज तरुणी ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तिचा मोठा भाऊ पुण्यात खासगी नोकरी करतो. तरुणीच्या आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. करवीर पोलिसांनी पंचनामा केला.तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.