प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - उचगांव येथील शरीफ मौला ताशिलदार (वय28.सध्या रा. रेंदाळ ता.हातकंणगले ) याचा मंगळवार (दि 24) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास रहात असलेल्या घरात इलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्याला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा एका एमआयडीसी कंपनीत नोकरी करत होता.आज दुपारी घरात मोटरच्या सहाय्याने पाणी भरत होते.पाणी भरून झाल्या नंतर स्विच बंद करीत असताना् इलेक्ट्रीक शॉक लागल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.या घटनेची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती. याच्या पश्च्यात आई-वडील आणि एक भाऊ आहे.