दोघां चोरट्या कडुन घर फोडीचा गुन्हा उघड , साडे चार लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - हुपरी पोलिस ठाण्यात घर फोडीचा गुन्हा दाखल असलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणुन यातील साडे चार लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी  प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर (वय 34.रा.वाळवेकरनगर ,हुपरी) आणि किरण मारुती जाधव (वय 25.रा.शिवाजीनगर ,हुपरी) या दोघांना ताब्यात घेऊन पुढ़ील तपासासाठी हुपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.सरगर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post