प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - पाचगाव परिसरातील उमेश बबन भगत (वय 38.रा.जगताप योगेश्वरी कॉलनी,पाचगाव ) याने सोमवार (दि 23) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास एन.टी .सरनाईक नगर येथील योगेश्वरी कॉलनी येथे रहात असलेल्या गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. यातील मयत हा फुटबॉल खेळाडू असून तो एका कॅन्टीन येथे कॉन्ट्रक्ट बेसवर कामाला होता.त्याची पत्नी बाहेर कामासाठी गेल्याने घरी कुणी नसल्याचे हा प्रकार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.त्याच्या पश्च्यात वडील पत्नी ,आणि दोन मुली आहेत.
त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.