प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- येथील कळंबा कारागृहातील शिक्षा झालेला कैदी मोहम्मद अफजल मोहम्मद जब्बर अन्सारी (वय ४८, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) याचा रक्तदाब कमी झाल्याने त्याला बुधवार (दि.11) रोजी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.यातील कैदी याला पोक्सो गुन्हाअंतर्गत ३ वर्षे शिक्षा झाल्याने मुंबईतून पाच महिन्यांपूर्वीच त्याला कळंबा कारागृहात पाठवले होते.त्याच्या
रक्तात साखरेचे प्रमाण अनियमित झाल्याने बुधवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रक्तदाब कमी होऊन सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती नातेवाईकांना दिली असता गुरूवारी मुंबईतून नातेवाईक कोल्हापूरात दाखल झाले. न्यायाधीशांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. पे इल मो लोई पे पे पे