पाच हजारांची लाच घेताना दोघे ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- तक्रारदाराकडे मृत्युचा दाखला आणि घराचा उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना परखंदळे व बांबवडे ग्रामपंचायत मधील  ग्रामविकास अधिकारी सचिन बाळकृष्ण मोरे (वय 44.रा.जुने पारगाव ,ता.हातकंणगले ) आणि  साळशी -पिशवी ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी प्रथमेश रविंद्र डंबे (वय 22.रा.जुने पारगाव ,ता.हातकंणगले )  या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.

यातील तक्रारदार यांनी त्यांचे सासरे यांचा मृत्युचा दाखला बांबवडे येथील सासरे यांच्या रहात असलेल्या घराचा उतारा मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.सदर दाखला आणि उतारा देण्यासाठी तक्रादार यांच्याकडे मोरे यांनी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान  तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली.लाचलुचपत विभागाने याची पडताळणी करून बुधवार (दि.11) रोजी  मोरे यांच्या सांगण्यावरुन प्रथमेश डंबे यांला  पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून  या दोघां ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते.         

ही कारवाई पुणे येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे ,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.शितल खराडे ,श्री.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला पोलिस अजय चव्हाण ,सुधीर पाटील,कृष्णात पाटील,चालक सहा.फौ.कुराडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post