प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिसांना अर्बन बँकेच्या पाठीमागे असलेल्या बाकड्यावर कल्याण मटका घेत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या परिसरातील छापा टाकून कल्याण मटका घेत असलेला एंजट निलेश तुकाराम इंदुलकर (वय 43.रा.ए "वॉर्ड वेताळमाळ तालीम,कोल्हापूर ) आणि बुकी मालक अमित विलास गुरव (रा.कोल्हापूर ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील रोख रक्कम एक हजार आठशे वीस रुपये जप्त करून त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत राजवाडा पोलिसांनी रंकाळा एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या एका दारु दुकानच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये उघड्यावर मटका चालू असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या परिसरात छापा टाकून कल्याण मटका घेत असलेला एंजट शौकत महमदगौस सय्यद (वय 55.रा.रंकाळा एसटी स्टॉप साकोली कॉर्नर ) कांतीलाल महादेव व्हटकर (सी ,वॉर्ड.रविवारपेठ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोख रक्कम दोन सातशे पंच्च्याहत्तर रुपये जप्त करून या दोघांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे उघड्यावर खुले आम पान टपरी मध्ये होत असलेली मावा ,गुटखा विक्री यामुळे अल्पवयीन मुले ही व्यसनाधीन होत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.