प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कामावरून चालत येत असलेल्या मोटारसायकलने दिलेल्या धडकेत बाळासो पांडुरंग कांबळे (वय 57.रा.मांगनूर, ता.कागल ) यांचा सोमवार (दि.09) रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सांगाव माळभाग परिसरात वाकी वसाहत येथे जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथुन उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे कागल फाइव्ह स्टार एमआयडीसी येथे एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणुन नोकरी करत होते.सोमवारी संध्याकाळी कामावरून घरी चालत येत असताना समोरुन येत असलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि तीन मुली आहेत.