प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील केर्ले येथील प्रज्ञा प्रविण सुतार (वय दीड वर्ष.रा.केर्ले ,मानेवाडी ) ही लहान मुलगी शुक्रवार (दि.27) रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या अंगणात खेळत असताना अचानक बेशुध्द होऊन पडल्याने तिला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
आज सकाळी प्रज्ञा नेहमी प्रमाणे अंगणात खेळत होती.ती एकुलती मुलगी असून तिने त्या परिसरात सर्वाना लळा लावला होता.तिचा अचानक मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.तिच्या झालेल्या मृत्यु मुळे नातेवाईकांनी आक्रोश केला .
----------------------------------------
बस चालकाने अचानक ब्रेक मारल्याने वृध्द जखमी.
कोल्हापुर - पाचगाव ते कदमवाडी या केएमटी बस मधुन प्रवास करत असताना चालकाने अचानक ब्रेक मारल्याने बस मधील प्रवासी एकमेकाच्या अंगावर पडल्याने गुरुबसाप्पा मलकाप्पा चेप्पूर (वय 70.रा.आयटीआय ,गणेश कॉलनी) त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.हा प्रकार शुक्रवार(दि.27) रोजी पावणे पाचच्या सुमारास घडला.
यातील जखमी पाचगाव ते कदमवाडी केएमटी बसने प्रवास करत असताना इंदिरा सागर सिंग्नल जवळ बस आली असता त्याच्या पुढ़े असलेल्या दुचाकी वाल्याने ब्रेक मारल्याने केएमटी चालकांनेही अचानक ब्रेक मारल्याने आतील प्रवासी एकमेकाच्या अंगावर पडले .त्यात गुरुबसाप्पा यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी चालक आणि वाहकाने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .