प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
पेठवडगांव - जुन्या वादातुन अंबप येथे तरुणाचा खून केल्या प्रकरणी हर्षद दिपक दाभाडे (वय 19.रा.माळवाडी ,अंबप ) आणि शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला (वय 19.रा.राजे गल्ली, आनंदनगर कोडोली ) या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना पुढ़ील तपासासाठी वडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यातील मयत यश किरण दाभाडे यांचा सोमवार (दि.02) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पाण्याची टाकी अंबप येथे खून झाला होता.या खूनाची नोंद वडगांव पोलिस ठाण्यात झाली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खूनाचा तपास करून खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानी दोन पथके तयार करून खून झालेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात माहिती घेऊन तपास सुरु केला.या तपासात यश दाभाडे यांने हर्षद दाभाडे याला एक वर्षापूर्वी मारहाण केली होती.यश यांच्यावर मारहाणीचा गुन्हा झाल्याने त्याची कारागृहात रवानगी झाली होती.तो अल्पवयीन असल्याने काही दिवसात कारागृहातुन बाहेर आला होता. तेव्हा पासून हर्षद यशवर चिडुन होता.सोमवार (दि.02) रोजी यश हा अंबप येथे असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ बसला असताना मोटारसायकल वरुन आलेल्या हर्षद आणि त्याच्या दोन साथीदारांनी यशला धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून करून पळुन गेले होते.आणि आरोपीनी आपल्या इंन्साट्राग्राम अंकाऊंटवर "तभी तो दुश्मन जलते है,हमारे नामे #302"अशी पोस्ट केल्याने अंबप गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते .या पथकाला तपासात मिळालेल्या माहितीनुसार या खूनातील आरोपी वारणानगर येथे असलेल्या विजय चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबूली दिल्याने पुढ़ील तपासासाठी वडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे ,पोलिस निरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.