प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - नजरचुकीने विषारी औषध घेतलेले दिलीप शिवाजी जाधव (वय 44.रा.पिंपळे तर्फ सातवे ,बांबरवाडी ,ता.पन्हाळा) यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत दिलीप जाधव यांची वाघबीळ येथे बेकरी आहे .(दि.24) रोजी सायंकाळच्या सुमारास जाफळे फाटा येथील एका शेतातील शेड मध्ये नजर चुकीने ग्रामोझोन नावाचे विषारी औषध घेतले होते.त्यांना त्याचा त्रास होताना घरातील नातेवाईकांना याची माहिती दिली.त्यांना तात्काळ उपचारासाठी वाघबीळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून तेथून उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
त्यांच्या पश्च्यात आई-वडील ,पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.