शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने राजारामपुरी परिसरात विशेष मोहिम .

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील राजारामपुरी येथे पहिली ते अकरावी गल्लीत नो पार्किंग, सम-विषम पार्किंगचे नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शुक्रवारी या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली.

राजारामपुरी परिसरात वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग व सम-विषम तारखेस पार्किंगचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र, बहुतांशी वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नो-पार्किग आणि सम-विषम पार्कींगचे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहेत. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शुक्रवारी पेट्रोलिंग पथक आणि शहर वाहतूक शाखेतर्फे जनजागृती करून विशेष मोहीम राबविण्यात आली. नो पार्किंगमध्ये कोणीही वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन केले. यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post