प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - पान खाण्यासाठी गेलेल्या खुदाई कामगार बसाप्पा यल्लापा कुरी यांना धडक देऊन पसार झालेला कार चालक सत्यजित शंकरराव चव्हाण (वय 34.रा.जिल्हा परिषद कॉलनी,बोंद्रेनगर ) याला शाहुपुरी पोलीसांनी अटक केली. पोलिसांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण. शाहूपुरी पोलिसांनी आपल्या कृतीतुन दाखवून दिले. कार चालकाने बांधकाम मजूराला धडक दिल्याने यात त्यांचा मृत्यू झाला होता.या अपघातात चालक न थांबताच पळून गेला होता. मात्र पोलीसांनी शहरातील ५० सीसीटीव्ही फुटेज पाहून अखेर धडक देणाऱ्या कार चालकाला बेडया ठेकल्या.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी हा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्याकडे दिला होता. जाधव यांनी पोलीस कॉन्स्टेबल मंजर लाटकर यांना सोबत घेऊन शाहूपुरी विल्सलन पूल ते रंकाळा तलावापर्यंत सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांना दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत अपघातग्रस्त कार आढ़ळली. त्यांनी तीन ते चार दिवस चिकाटीने तपास केल्यामुळे अपघातग्रस्त चालक हाती लागला.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील बसाप्पा यल्लाप्पा कुरी (वय ६६ सध्या रा. शाहूपुरी) हे बांधकाम तसेच खुदाई कामासाठी कोल्हापुरात आले होते. शाहूपुरीत ते कुटुंबियांसह भाडयाने राहत होते. बुधवार,दि. १० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता कुरी हे मोपेडवरून कामावर निघाले होते. शाहूपुरी विल्सन पूलाजवळ अज्ञात कार चालकाने त्यांच्या मोपेडला पाठीमागून धडक दिली. कुरी हे खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले होेते.
उपचार सुरू असताना ११ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कार चालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. अपघात झाल्याचे कोणीही पाहिले नव्हते. या रोडवरून दररोज हजारो वाहने जातात त्यामुळे धडक देणारी नेमकी कार शोधून काढणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी हा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्याकडे सोपवला होता. जाधव यांनी शाहूपुरी विल्सन पुलापासून ते रंकाळा टॉवर पर्यंतचे सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटजे तपासले. तेव्हा दोन ठिकाणच्या फुटेजमध्ये धडक देऊन निघून गेलेली कार व तिचा नंबर सापडला. त्यानुसार पोलीसांनी कार चालकाचे नाव व पत्ता शोधून काढला.
या अपघात प्रकरणी कार चालक सत्यजीत चव्हाण याला अटक केली आहे. मृत कुरी हे मोलमजूरी करणारे गरीब कुटुंबातील होते. कार चालकाने त्यांना वेळेत रुग्णालयत दाखल केले असते तर ते वाचले असते .
--------------------------------------------------
लुटमारी करणाऱ्या दोघां सराईतांना अटक
लूबाडणूक केलेल्या मोपेडसह पाकिट जप्त.
कोल्हापुर- रात्री जेवण उरकल्यानंतर पान खाण्यासाठी गेलेल्या अशोक अण्णाप्पा खांडेकर (वय ४५, रा. मैथिली अपार्टमेंट, कावळा नाका) हे लिशा हॉटेल परिसरातील टपरीवर गेला होते.त्यांनी मोपेड रस्त्याकडेला उभी केली होती. पान घेऊन परतताना तेथे दोघांनी जबरदस्तीने त्याला त्याच्याच मोपेडवर बसवून रुईकर कॉलनी परिसरात नेऊन बेदम मारहाण केली व दुचाकी, खिशातील पाकिट हिसकावून घेऊन पलायन गेले. दि. ११ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पियुष शंकर पोवार (वय २१) व आदर्श उर्फ पिल्या संजय गायकवाड (वय २१, रा. दोघे विचारे माळ परिसर) या दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई शाहूपुरीचे पो. नि. संतोष डोके, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संदीप जाधव, मिलींद बांगर, महेश पाटील, विकास चौगले, रवी आंबेकर, सनिराज पाटील, बाबा ढाकणे, सुशिल गायकवाड या पथकाने शोध मोहिम राबवून सराईत गुन्हेगार पियुष व आदर्श यांना जेरबंद केले.
यांची फिर्याद दि. ११ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी अशोक अण्णाप्पा खांडेकर (वय ४५, रा. मैथिली अपार्टमेंट, कावळा नाका) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.दुचाकीवर जबरदस्तीने बसवून रुईकर कॉलनी परिसरात नेऊन अंधारात मारहाण करून त्यांच्या खिशातील पाकिट काढून घेऊन फिर्यादीची दुचाकी हिसकावून तेथून पलाायन केल्याची कबुली संशयितांनी दिली. पोलिसांनी संशयितांकडून मोपेड व पाकिट जप्त केले आहे.
संशयीत पियुष पोवार व आदर्श गायकवाड हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर घरफोडी, गंभीर मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.