फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून साडेतीन लाख रुपयांची रक्कम लुटल्या प्रकरणी पाच जणांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- राजेंद्रनगर परिसरात असलेल्या महिलांच्या बचतगटाची जमा झालेली रक्कम घेऊन येत असताना फायनान्स कंपनीचा कर्मचारी आकाश जगन्नाथ शिंदे (वय 26.रा.माले ता.हातकंणगले ) याला मारहाण करून त्याच्या कडील तीन लाख त्र्याहत्तर हजाराची रक्कम लुटल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या काही तासात सनी बाबासाहेब शिंदे (वय 29.रा.भारतनगर ,साळोखे पार्क )किरण स्वामी वैदु (वय31.रा.साळोखे पार्क ,राजेंद्रनगर )अभिजीत अनिल आवळे , विजय सुरेश कदम (वय 20) आणि रोहित सुरेश कदम (वय21.तिघे रा.जवाहरनगर ,राजेंद्रनगर झोपडपट्टी जुना कंदलगाव नाका) यांना अटक केली.

कदमवाडी परिसरात असलेल्या हॉटेल लिशाजवळील भारत कंपनीचा वसुली कर्मचारी आकाश जगन्नाथ शिंदे (वय 26) याला अनोळखी  चार ते पाच  हल्लेखोरांनी मारहाण करून तीन लाख त्र्याहत्तर हजाराची रोकड लंपास केल्या प्रकरणी त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.हा प्रकार गुरुवार दिनांक 05 रोजी रात्रीच्या सुमारास टाकाळा परिसरात घडला होता.

सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी  स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपास करून घडलेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.स्थानिक गुन्हें अण्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह पथके तयार करून रवाना केली.

सदर घटनेचा तांत्रिकदृष्ट्या तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना माहिती मिळाली कि बचत गटातील संगीता शिंदे यांच्याकडील जमा झालेली तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये नेत असताना तिचा मुलगा सनी शिंदे यांनी कट रचल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने लुटीची कबुली दिली.त्यावरुन अन्य साथीदाराची नावे पत्ते विचारुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लुटीतील अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्हयांत वापरलेली एक लाख रुपये किमंतीची सुझुकी मोपेड व   वीस हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून पाच संशयीताना पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस वैभव पाटील,महेंद्र कोरवी,प्रदीप पाटील,प्रविण पाटील,गजानन गुरव ,संतोष बर्गे,विशाल खराडे आणि विलास किरोळकर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post