प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील कणेरी वाडी येथे रहात असलेला रोहित यशवंत शिंणगारे (वय 25.रा.मोरे गल्ली ,कणेरीवाडी) याचा शनिवार (दि.14) रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास जनावरांच्या गोट्यात जनावरांना एअरगनच्या सहाय्याने धुत असताना त्याला इलेक्ट्रीकचा शॉक लागून मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा जनावरांचा डॉक्टर असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.आज शनिवारी दुपारी जनावरांच्या गोट्यात जनावरांना एअरगनच्या सहाय्याने धुत असताना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने त्याचा मृत्यु झाला.यात एका जनावरांचा शॉकने मृत्यु झाला असून त्याची आजी थोडक्यात बचावल्या अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.त्याच्या पश्च्यात आई-वडील एक भाऊ आणि एक बहिण आहे.