प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- कागल तालुक्यातील वंदुर येथे रहात असलेल्या गुलताज शकील मिया (वय 25.रा मुळगाव शारुखपिया , सेंदपुर ,उत्तरप्रदेश .सध्या रा.वंदुर ता.कागल) यांचा बुधवार( दि 17) रोजी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत या वंदुर येथे गुर्हाळ मालक पारिसा भिमराव जेंगटे यांच्याकडे कुंटुबिया समवेत गुर्हाळ कामासाठी तीन ते चार महिन्या पासून रहात होत्या.त्या नऊ महिन्याच्या प्रेंग्नेट असल्याने त्यांची प्रसुती वंदुर येथे रहात असलेल्या घरात झाली होती. बाळ चांगले आहे.पण प्रसुत महिलेची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे प्राथमिक उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.