प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- चांदी कामगार अक्षय शिरीष सावंत (वय 28.मुळगाव बावेली ता.गगनबावडा.सध्या रा.न्यु.कणेरकरनगर ) याने मंगळवार (दि.17) रोजी सायंकाळच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या तुळईला साडीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत अक्षय हा शामराव कुंभार नगर येथील चांदी व्यावसायिक संभाजी सावंत यांच्याकडे दहा -बारा वर्षे चांदी कामगार म्हणुन काम करीत होता.त्याचे मुळगाव गगनबावडा तालुक्यातील बावेली येथील असून तो सध्या न्यु कणेरकरनगर येथे ज्ञानसागर नामदेव कोंडरे यांच्या घरी भाड्याने रहात होता.त्याची पत्नी गावी गेल्या होत्या.घरी कुणी नसल्याचे पाहुन कोंडरे यांच्या भाड्याच्या घरात गळफास लावून घेतल्याचा प्रकार केला.हा आज कामाला न आल्याने त्याचे मालक त्याच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.त्याच्या पश्च्यात आई-वडील ,पत्नी आणि एक मुलगी आहे.