प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथील न्यानदेव धोंडिराम पाटील (वय 79.रा.रांगडे गल्ली ,यवलूज ) यांनी गुरुवार (दि.05) रोजी सकाळी नऊच्या सुमारास रहात असलेल्या घरात छताच्या लोखंडी पाईपला लुंगीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे केएमटीकडे चालक म्हणून काम करीत होते.सध्या सेवा निवृत्त होऊन घरीच होते.त्यांच्या पश्च्यात तीन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे.
Tags
कोल्हापूर