सरत्या वर्षात पोलिसांची सर्वोत्कृष्ट कामगिरी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी थोडीशी  घट झाली असून यात घरगुती वादातुन मारामारी पासून खून प्रकरणं,प्रेमप्रकरण ,भांडणे आणि दोन्ही गटातील खुन्नस यांचा समावेश आहे.गेल्या वर्षात साठ पेक्षा जास्त खूनाच्या घटना घडल्या असून त्यात प्रामुख्यांने दोन गटातील खुन्नस ,घरगुती वाद आणि आर्थिक देवाण घेवाण या कारणामुळे खूना सारख्या घटना घडल्या आहेत.पण पोलिसांनी गुन्हयांतील आरोपीचा शोध घेऊन त्यांना कोठडीची हवा खाण्यास भाग पाडले आहे.या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून कोणतेही गालबोट न लागता निर्वीघ्नपणे पार पाडल्या.कोल्हापूर शहरात काही ठिकाणी भरदिवसा खूना सारख्या घटनेने कोल्हापूर शहर हादरुन गेले होते.त्यातील आरोपीना गजाआड करण्यास पोलिसांना यश आले.

गेल्या दोन वर्षांत आर्थिक फसवणूकीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.यातील काही प्रमाणात गुन्हे पोलिसांत दाखल आहेत.यात भामट्यांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.यातील काही प्रमाणात छडा लागला .पण म्हणावी तशी गुन्हें उघडकीस आणण्यास प्रगती झाली नाही.या घडलेल्या घटनेमुळे पोलिस प्रशासनाकडुन गुंतवणूकदारांनी फसव्या लोभा पासून दुर रहाण्याचे प्रबोधन केले.

कोल्हापुर शहरात आणि जिल्हयात सुरु असलेले अवैद्य धंदे यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना आळा घालण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारीना पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी आदेश दिले होते.त्यांच्या आदेशा नुसार चालू वर्षी जुगार कायद्यानुसार 1472 गुन्हे दाखल करुन दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले.दारुच्या कारवाईत 3467 गुन्हें दाखल करून पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अंमली पदार्थत 112 केस दाखल करून 86 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे गुटखा कारवाईत 76 गुन्हे दाखल करुन दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे अल्पवयीन मुलींना पळवून नेलेल्याच्या गुन्हयांचा तपास चार महिन्यानंतर दाखल असलेल्या पोलिस ठाण्याकडुन येत असतो अशा या वर्षात 36 गुन्हयांत 25 मुलींचा शोध घेण्यात यश आले.अशा सात गुन्हयांतील 22 आरोपीना अटक करून 13 पिडीत स्त्रियांची सुटका करून वर्दळीच्या ठिकाणी  रस्त्यात उभे राहून अश्लिल वर्तन करीत असलेल्या वारांगणावर दहा गुन्हे दाखल करून 27 स्त्रियांच्यावर कारवाई करण्यात आली.

चालू वर्षी पोलिसांनी न्यायालयात पाठविलेल्या 318 गुन्हयांचा निकाल लागला असून 281गुन्हे सुटले तर 37 गुन्हे शाबीत झालेत.याचे प्रमाण सरासरी 12% आहे.त्याच प्रमाणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कडील 5476 गुन्हयांचा निकाल लागून 1439 गुन्हे शाबीत झालेत.याचे प्रमाण 26% आहे.

कोल्हापुर जिल्हयात आणि शहरात चालू वर्षांत खुनाचे 62 गुन्हे दाखल आहेत.गेल्या वर्षी फक्त 48 खूनाच्या घटना घडल्या 

होत्या.गेल्या वर्षी 81 एवढी आकडेवारी होती.या वर्षी 13 ने.  कमी झाली आहे.


गुन्हा      2023          2024

जबरी चोरी-  112             63

बलात्कार   -  183           179

घरफोडी चोरी 397           339

गर्दीमारामारी  432           274

विनयभंग       414           313

दुखापत         1076         881

मु.पळवून नेणे  257         249 

----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post