शॉक लागून सेट्रिंग कामगाराचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोगे येथील सुभाष पंडीत चव्हाण (वय -44) यांचा शुक्रवार (दि.13) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कोगे येथे नाथाजी पाटील यांच्या घराचे सेट्रिंग काम करीत असताना तेथून 11KV.मेन वायरला सळीचा स्पर्श झाल्याने सुभाष यांना शॉक लागल्याने बेशुध्दावस्थेत बालिंगा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करून तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत सुभाष चव्हाण हे सेट्रिंग काम करीत असून ते सचिन घराळ या ठेकेदाराकडे काम करीत असतात.ठेकेदार घराळ यांनी कोगे येथील नाथाजी पाटील यांच्या घराचे काम घेतले होते.तेथे सुभाष हा सळीचे काम करीत असताना तेथील वायरला सळीचा स्पर्श झाल्याने शॉक बसला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात आई ,पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post