प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- खूनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीतील पसार असलेले पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार विश्वनाथ उर्फ बिल्ड़र सौदागर कांबळे (वय 24.रा.राजेंद्रनगर ,को.)आणि सद्दाम हुसेन नजीर देसाई (वय 32.रा.विक्रमनगर ,को.) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
या दोघांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ते गुन्हा घडल्या पासून पसार झाले होते.त्या दोघांचा शोध घेऊन ही पोलिसांना मिळुन येत नव्हते.सदर आरोपीवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला या दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर आरोपींचा शोध घेत असताना विश्वनाथ उर्फ बिल्ड़र सौंदागर कांबळे हा शेंडा पार्क येथे आणि सद्दाम हुसेन नजीर देसाई हा लक्ष्मीपुरी येथील कोंडा ओळ येथे येणार असल्याची माहिती असता स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून विश्वनाथ कांबळे याला शेंडा पार्क येथून तर सद्दाम देसाई याला लक्ष्मीपुरीतील कोंडा ओळ येथून ताब्यात घेऊन या दोघांना पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस वैभव पाटील,विशाल खराडे,गजानन गुरव यांच्यासह आदीनी केली.