" राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्काराने "सौ प्रमोदिनी माने सन्मानित.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

वारणानगर - पुणे न्युज एक्सप्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 चा वारणा कोडोली येथील महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतच्या संघटक आणि पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सौ.प्रमोदिनी मारुती माने यांना "राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या मौलाना आझाद सांस्कृतिक भवन येथे सोमवार (दि.09) रोजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.Ad.आयुब शेख यांच्या हस्ते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद,मा.इकबाल अन्सारी ,मा.अब्दुल कइम अब्दुल रशीद मा.खंडू इंगळे,मा.तुषार निकाळजे ,मा.फिरोज मुल्ला सर ,मा.अरुण दिनकर जमादार आणि पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मा.मेहबूब सर्जेखान यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.

पुणे न्युज एक्सप्रेसच्या वतीने गेल्या चार पाच वर्षांपासून समाजातील सामाजिक,राजकीय ,कला आणि क्रिडा क्षेत्रातील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.या वर्षीचा सौ.प्रमोदिनी माने यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post