प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - हुतात्मा पार्क येथे दारू पिण्यास बसलेल्या अभिषेक माळी आणि त्याच्या साथीदारांनी संगणमत करून अशोक पाटील (वय ४८ रा. पिशवी,ता.शाहूवाडी) यांचा खून करून धड व मुंडके वेगळे केले होते. आठ महिन्यानंतर या खुनाला वाचा फुटली पोलीसांनी रावण गॅँगच्या दोघांना अटक केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयीतांनी मुंडके गाळात पुरले होते. ते शोधण्यासाठी पोलीसाचे पथक लवकरच हुतात्मा पार्कमध्ये जाऊन शोध घेणार आहे. दरम्यान अटक केलेले अभिषेक माळी व अतुल शिंदे (रा.डवरी वसाहत, यादवनगर) यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
४ मार्च,२०२४ रोजी जुना राजवाडा पोलीसांना हुतात्मा पार्क नाल्यात एका व्यक्तीचे डोके नसलेले फक्त धड सापडले होते.त्याला मुंडके नव्हते. पोलीसांनी अथक प्रयत्न करून मृतदेहाची ओळख पटवली. यासाठी डीएनए, फॉरेंसिक लॅबची मदत घेतली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या खून प्रकरणात दोघांना अटक केली. मात्र त्यांना आपण खून कोणाचा केला हेच संशयीतांना माहिती नव्हते. शेवटी राजवाडा पोलीसांकडून माहिती मिळाल्यानंतर हा खून अशोक पाटील नावाच्या व्यक्तीचा झाल्याचे स्पष्ट झाले.
खून केल्यानंतर रावण गॅगने ऐडक्याने पाटील यांचे मुंडके तोडून ते गाळात पुरून ठेवले होते. तसेच मृताचे कपडे काढून ते दुसरीकडे फेकले. धड नाल्यात फेकला. नाल्याची सफाई करताना महापालिकेच्या जेसीबीने नाल्यातील गाळ काढ़ताना हा मृतदेह बाहेर आला होता. आता पोलीसांना मुंडके शोधावे लागणार आहे. संशयीत आरोपींना सोबत घेऊन ते ज्या ठिकाणी दाखवतील तेथे जेसीबीने खुदाई करून मुंडक्याचा शोध घ्यावा लागणार आहे. येत्या दोन दिवसात जुना राजवाडा पोलीसांचे पथक ही मोहिम हाती घेणार आहे. अशी माहिती तपास अधिकारी संजीवकुमार झाडे यांनी दिली.
-------------
दोन कोटी सापडलेल्या 'त्या' रकमेचा तपास आयकर विभागाकडून.
कोल्हापुर - शाहूपुरी पोलिसांनी ताराबाई पार्क परिसरात थांबलेल्या एका कारमधून दोन कोटींची रक्कम ताब्यात घेतली होती. ही रक्कम व जवळ बाळगणारे दोघे यांना आयकर विभागाच्या ताब्यात दिले आहे. त्यानुसार आयकर विभागाकडून याबाबतचा तपास सुरू झाला आहे. सराफ व्यावसायिक माणिक पाटील यांची ही रक्कम असल्याचे समजते. याबाबत कागदपत्रे आयकर विभागाने मागवली असल्याचे समजते.
इतकी मोठी रक्कम बेकायदेशीररीत्या घेऊन जाणे हा गुन्हा आहे. याबाबत संबंधितांकडे कोणतीही कागदपत्रे अथवा ठोस कारण नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन आयकर विभागाच्या ताब्यात दिली. त्यानुसार आयकर विभागाने तपास सुरू केला आहे. प्रारंभी या रकमेचा मूळ मालक कोण, कोल्हापूर शहरातून कोणाकडून घेतली, उडुपी कर्नाटक येथे ती कोणाला दिली जाणार होती, याबाबतची माहिती घेतली जात आहे.