प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - गुजरीतील सराफ व्यावसायिकाला चांदीचे दागिने तयार करून देतो असे सांगून एका कारागिराने २३ किलो ६३४ ग्रॅम चोख चांदी व ९८५ ग्रॅम कॉपर ॲलाय असा बारा लाखांचा मुदद्देमाल नेला होता. पण त्याने दागिने करून न देताच कारागिर चांदी घेऊन पसार झाला.त्या ठकसेनाचे नाव राम गोपल जना (रा.सध्या पदद्मा टॉकीज जवळ,लक्ष्मीपुरी,मुळ पश्चिम बंगला) असे संशयीताचे नाव आहे. सराफ व्यापारी सुरेश टेकचंद जैन (वय ५७ रा.गुजरी) यांनी बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुरेश जैन यांचे गुजरी परिसरात सोने,चांदींचे दागिने विक्रीचे दुकान आहे. त्यांना ऑगस्ट,२०२४ पासून पश्चिम बंगाल येथील कारागिरी राम गोपाल जना हा चांदीचे अलंकार व दागिने करून देत होता. आतापर्यत त्याने वेळेवर आणि प्रामाणिकपणे दागिने करून दिले होते. मात्र गेल्या दीड महिन्यापासून जैन यांनी १२ लाख रुपयांची चोख चांदी या कारागिराकडे दागिने करण्यासाठी दिली होती.
ही चांदी घेऊन कारागिर राम जना हा पळून गेला. सराफ व्यावसायीक जैन यांची त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. गावी गेल्यानंतर परत येईल म्हणून वाट पाहिली, मात्र त्याचा मोबाईलही बंद आहे. आपली फसगत झाल्याचे जैन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. १८)जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचें पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तपास करीत आहेत.
--------------
मोटारसायकल दारात उभी केल्याच्या कारणावरून हाणामारीत तिघे जखमी . चौघांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल.
कोल्हापुर- मोटारसायकल दारात उभी केल्याच्या कारणावरून राजारामपुरी परिसरातील मातंग वसाहत येथे तरुणाच्या घरात घुसून चौघांनी लोखंडी सळी व काठीने तिघांना बेदम मारहाण केली. मंगळवारी रात्री बारा वाजता हा प्रकार घडला. अमित आप्पासाहेब येडाळे (वय ३३, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) याने राजारापुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या मारहाण प्रकरणी संशयित अल्केश अतुल कवाळे (वय २२), शुभम महेश बुचडे (वय २६, रा. राजारामपुरी) यांच्यासह दोन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत फिर्यादी अमित येडाळे, त्याची आई लता येडाळे, भाऊ सुजय येडाळे हे जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमित येडाळे याचे वडील व संशयित अल्केश कवाळे यांच्यात दारात दुचाकी उभी करण्यावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून अल्केश कवाळेसह चौघांनी अमितच्या घरात घुसून त्याला बाहेर ओढून सळीने बेदम मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या लता येडाळे व सुजय येडाळे यांनाही काठीने मारहाण झाली. या प्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निळपणकर तपास करीत आहेत.