प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -ताराबाई पार्क येथे असलेल्या इन्साकार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनी असून या कंपनीतील मालाची परस्पर विक्री करुन कंपनीची सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी यासिन कंलदर नदाफ (वय24.रा.शाहुनगर झोपडपट्टी ,जयसिंगपूर ) आणि विशाल संजय लोहार (वय 23.रा.जागृतीनगर ,कोल्हापूर) या दोघांना अटक केली.
ताराबाई पार्क येथे इंन्साकार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.कंपनी असून त्या कंपनीत कपिल अशोक रोटे (वय38.रा.बाहुबली,ता.हात.) हे या कंपनीत व्यवस्थापक असून यासिन नदाफ आणि विशाल लोहार हे डिलीव्हरी बॉय म्हणुन नोकरीस आहेत.या दोघांनी संगनमत करून या कंपनीतील मालाची परस्पर विक्री करून सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार दि.01/10/2021ते 05/11/2021 या कालावधीत घडला होता.हा प्रकार व्यवस्थापक विशाल रोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी या दोघांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात दि.10/11/2024 रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला होता.
यातील जयसिंगपूर येथील एका संशयीताला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.