प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कोल्हापुर जिल्ह्यात आणि शहरात 31.डिसें.च्या निमित्ताने गोवा बनावटीची दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी पथके तयार करून तपासणी नाक्यावर भरारी पथक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन आहे.कोल्हापुर पाठोपाठ सांगली,सातारा जिल्ह्यात सुध्दा गोवा बनावटीची दारुची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते.काही गुन्हेगारी टोळक्यांच्या मदतीने दारुची वाहतूक होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभाग आता पासून दोघांचा समन्वय राखत उपाय योजना करण्यात येत आहे.
या वेळी माहिती देताना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक आणि शहर उपअधिक्षक युवराज शिंंदे यांनी 31डिसे.च्या निमित्ताने देशी ,विदेशी दारूची वाहतूक रोखण्यासाठी कडक उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.कोल्हापूर जिल्हयात सीमा रेषेवर असलेल्या पर राज्यातुन कोल्हापूर शहरात प्रवेश करत असलेल्या प्रमुख मार्गावर 15 डिसे.पासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगून 25 डिसें .ते 02 जानेवारी या कालावधीत भरारी पथकाची तस्करी टोळक्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले.