प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - इंचलकरंजी येथे पत्नी नांदवयास येत नाही या कारणातुन सासऱ्याचा खून करून पसार झालेला आरोपी सिंकदर मोहम्मदअल्ली शेख (वय 32.रा.षटकोन चौक ,इंचलकरंजी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या बारा तासात अटक केली.
अधिक माहिती अशी की,आरोपी सिंकदर यांने पत्नी नांदवयास येत नसल्याच्या कारणातुन सासरा जावेद बाबू लाटकर (वय 41.रा.तीन बत्ती चार रस्ता आझाद चौक,इंचलकरंजी) यांचा बुधवार (दि.25) रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्याशी भांडण तंटा करून त्यांच्या चेहर्यावर दगडाने मारुन खून केला होता.या खूनाची फिर्याद फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिल्याने त्याच्या फिर्यादी वरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला खूनातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पथकातील पोलिसांनी पथके तयार करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना या खुनातील आरोपी हा सकाळी कराड येथे एसटी स्टँड परिसरात येणार असून तो एसटीने बाहेर गावी जाणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हयांची कबुली दिल्याने त्याला पुढ़ील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस संजय कुंभार ,प्रशांत कांबळे,नवनाथ कदम ,महेश पाटील,सागर चौगुले,यशवंत कुंभार आणि सायबर सेलचे विनायक बाबर यांनी केली.