प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - .राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथील .दत्तात्रय धोंडी पाटील (वय 67) याचा बुधवार (दि.25) रोजी दुपारी एक च्या सुमारास खिंडी व्हरवडे ते आणाजे रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी भोगावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे आज दुपारी एकच्या सुमारास खिंडी व्हरवडे या आपल्या गावातून सायकल वरुन आणाजे येथे त्यांची शेती असून ते शेताकडे गेले होते.ते शेतातुन परत येत असताना कणकवली येथील रहात असलेले मारुती गोवेकर(वय 56.रा.परबवाडी ,कणकवली) हे निवृत्त शिक्षक असून त्यांच्या नातेवाईकांचे कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम येथे गुरुवार (दि.27) रोजी लग्न कार्य असल्याने ते आपल्या कुंटुबिया समवेत आपल्या कारने कणकवली येथून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना खिंडी व्हरवडे ते आणाजे या मार्गावर असलेल्या शेतातुन वरती येत असलेल्या दत्तात्रय पाटील यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते हवेत उडून कार वर जोरात आदळल्याने गंभीर जखमी होऊन मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.यांच्या पश्च्यात
पत्नी एक मुलगा आणि सून आहे.या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती..या अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. राधानगरी पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात येऊन सदरच्या मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.