वैरणीचा भारा डोक्यावरून घेऊन चाललेल्या शेतकरयाचा ओढ़यात पडुन मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील शेतकरी रंगराव यशवंत कोंडेकर (वय 60) यांचा वैरणीचा भारा डोक्यावरून घेऊन जात असताना ओढ़यात पडून मृत्यु झाला.हा प्रकार सोमवार (दि.02) सकाळी उघडकीस आला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

रविवार (दि.01) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रंगराव कोंडेकर वैरणीचा भारा डोक्यावरून घेऊन जात असताना तेथील बाळासाहेब आडनाईक यांच्या शेतातुन जात असताना ओढ़याजवळ पाय घसरल्याने भारयासह ओढ़याच्या पाण्यात बुडाले.त्यांच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी रंगराव कोंडेकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पत्ता लागला नाही.आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला असता पाण्यातुन बाहेर काढ़ुन उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वी मृत्यु झाला.या घटनेने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post