सहा.पोलिस निरीक्षक आणि पोलिस कॉ.ताब्यात.तर उपनिरिक्षक पसार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- जप्त केलेला टेम्पो सोडविण्यासाठी आणि दाखल असलेल्या गुन्हयांत मदत करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यारया गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक शंकर जाधव (वय 44.रा.अर्थव ओंकार कॉप्लेक्स बापट क्य्म्प.को.मुळगाव पेठकिनाई,सातारा ) पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे (सध्या रा.विठूमाऊली अपार्टमेंट निगडेवाडी उचगांव .मुळगाव उमरगा ,उस्मानाबाद) आणि पोलिस कॉ.संतोष बळीराम कांबळे (वय 33.रा.शिरोली हौसिंग सोसायटी ,माळवाडी शिरोली) या तिघांना लाचलुचपत पथकाने या तिघांच्या विरोधात लाचेची मागणी केल्या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार आणि त्यांचा मित्रांचा जनावरे वाहतूकीचा व्यवसाय करीत असून त्यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या गुन्हयांत पोलिसांनी त्यांचा टेम्पो जप्त केला आहे.तक्रारदार यांनी दि.25 नोव्हेंबर ला जप्त केलेला टेम्पो सोडविण्याकरता कोर्टात म्हणणे देण्यासाठी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिरगारे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रादाराकडे म्हणणे देणेसाठी 30/ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तसेच तक्रारदार यांच्या मित्राला फोन करून गुन्हयांत मदत करतो या साठी मित्राकडे 35/ हजार रुपयांची लाचेची मागणी केली म्हणुन तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.सदर लाचलुचपत विभागाने या अर्जाची पडताळणी केली असता त्या मध्ये तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्हयांत मदत करून जप्त केलेला आयशर टेम्पो सोडविण्यासाठी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिरगारे यांनी तक्रारदार यांना फोनवर पोलिस कॉ.कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले प्रमाणे तक्रारदार यांनी पोलिस कॉ.कांबळे यांची भेट घेतली असता कॉ.कांबळे यांनी तक्रारदार यांच्या समक्ष शिरगारे यांना फोन करून दुर्गेश आला आहे त्याला सांगितले का असे सांगून त्यांच्यात बोलणे झाल्यानंतर शिरगारे यांच्या सांगण्यावरुन कॉ.कांबळे यांनी तक्रारदाराकडे 20 /हजार रुपयांची लाचेची मागणी करत त्यात तडजोड करून 15/हजार रुपये शिरगारे यांना देण्यासाठी लाचेची मागणी केली.त्याच प्रमाणे सहा.पोलिस निरीक्षक दिपक जाधव यांनी तक्रारदार हा अटकेत असताना सदर गुन्हयांत मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्या पार्टनर कडुन या अगोदर पैसे घेतल्याची कबुली देऊन गुन्हयांत मदत करण्यासाठी राहिलेली रक्कम 35/हजार रुपये या दोघांच्याकडे मागणी केली.व गाडी सोडण्यासाठी म्हणणे देणे करता शिरगारे यांना 10/हजार रुपये द्या.असे म्हणून शिरगारे यांच्या साठी मागणी केल्याचे दिसून आल्याने तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन सहा पोलिस निरीक्षक दिपक जाधव,पोलिस उपनिरिक्षक शिरगारे आणि कॉ.संतोष कांबळे यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बापू सांळुखे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.