प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- पन्हाळा तालुक्यातील पोहाळेवाडी येथील तानाजी विश्वास पाटील (वय 40) यांचा शुक्रवार (दि 27) रोजी सातच्या सुमारास बाजारभोगाव येथील बार जवळ समोरा समोर मोटारसायकलच्या धडकेत जखमी झाल्याने त्यांच्या वर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
तानाजी पाटील हे ऊस तोडणीचे काम करीत असून ते शुक्रवारी मोटारसायकल वरुन बाजारभोगाव येथून पोहाळेवाडीकडे येत होते.तर दुसरा मोटारसायकल किसरुळ गावी जात होता.त्यांच्यात बाजार भोगाव येथे बार जवळ समोरा समोर मोटारसायकलची जोराची धडक झाल्याने तानाजी पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात आई,भाऊ ,पत्नी आणि तीन मुली आहेत.