प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून कोल्हापूरच्या जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे गुंडागर्दी खूनखराबा अनाधिकृत लॉटरी व्यवसाय तसेच दोन नंबरचे सर्व व्यवसाय त्यात भरीतभर म्हणून गांजा व इतर सर्व नशिल्या पदार्थांचा धोका वाढत चालला आहे त्यामुळे तरुण-तरुणी या नशिल्या पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत आपण स्वतः कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व दोन नंबरच्या व्यवसायाला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई करत आहात हे आमच्या निदर्शनास आले आहे परंतु ज्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे ते गुन्हे अन्वेषण खात्याचे प्रमुख व त्यांचे असणारे सर्व सहकारी नेमकी कोणती सेवा बजावतात हे कदाचित आपल्याला माहिती नाही का? कायदा सुव्यवस्था व दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी पूर्णतः गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे असते परंतु आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे गुन्हे अन्वेषण खात्यातील अनेक पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या वसुलीत गुंतले आहेत का? व नेमकी ही वसुली कुठेपर्यंत पोहोचते याची चौकशी करून कडक कारवाई करावी .यात काहीची नावे आम्ही घेतलेल्या माहिती प्रमाणे खालील नावे समोर आली आहेत.
उत्तम सडोलीकर - नेमणूक राधानगरी- मटका व क्लब
वैभव पाटील- ऑनलाइन लॉटरी व गोव्याच्या धरतीवर चालू असलेला कॅसिनो
संतोष बरगे- रेशन धान्य दुकान
हिंदुराव केसरे- अवैद्य दारू विक्री
विजय कोळी- गुटखा
अमोल कोळेकर - बेटिंग
आनंदा पाटील- लॉजिंग
प्रकाश नरके - गॅस काळाबाजार
आम्ही दिलेल्या माहितीनुसार या सर्वांचे व त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करावी म्हणजे आम्ही दिलेली माहिती सत्य की असे ते आपल्या लक्षात येईल या चौकशी बरोबरच गेल्या तीन वर्षांमध्ये गुन्हे अन्वेषण शाखा व आर्थिक गुन्ह्यांविषयी शाखेमध्ये ट्रेडिंग व्यवसायामध्ये दामदुप्पटीच्या आमिषाने फसलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करावी.
तसेच ट्रेडिंग बिजनेस ची किती गुन्हे दाखल झाले व किती जणांवर कारवाई झाली त्याचा तपशील वरिष्ठांनी तपासावा अशी आपणास विनंती आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे आर्थिक गुन्हे अन्वेषण व स्थानिक गुन्हे अन्वेषण कारकिर्दीमध्ये कोणते गुन्हे घडले व त्याच्या तपासाचा तपशील अन्य जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून तपासल्यास जिल्हा पोलीस प्रशासनाच्या लक्षात येईल की या तीन वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी व अवैध व्यवसाय वाढण्याचे कारण काय ?
वरील गंभीर प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आपल्या किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन सोडावे लागेल .
यात संजय पवार ,विजय देवणे ,विशाल देवकुळे,अवधुत साळोखे,मंजीत माने,संतोष रेडेकर ,भरत आमते,विवेक काटकर ,स्मिता सावंत,रुपाली घोरपडे ,युगंधर कांबळे ,रीमा देशपांडे ,लतीफ शेख ,उत्तुरे ,अभि दाभाडे ,दिनेश साळोखे पप्पू कोंडेकर आणि ओंकार सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.