प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- राधानगरी तालुक्यातील चाफोडी येथे रहात असलेल्या मंगल पांडुरंग चरापले (वय 40)या विवाहित महिलेचा पती पांडुरंग चरापले (वय 48) याने तिच्यावर संशय घेऊन रागाच्या भरात तिचे भिंतींवर डोके आपटुन आणि गळा आवळुन खून केल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की,पांडुरंग चरापले हा पत्नी मंगलवर चारित्र्याचा संशय घेऊन वाद घालत असे .याच कारणातुन सोमवार(दि.16) रोजी सायंकाळी वाद झाला.या वेळी पांडुरंगला राग न आवरल्याने पत्नी मंगल हिचे डोके भिंतीवर आपटुन आणि तिचा गळा आवळल्याने त्या बेशुध्द झाल्या होत्या.पांडुरंग याने बेशुध्द पडलेल्या पत्नीला उपचारासाठी राशीवडे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पत्नी मंगल ही जिन्यावरुन पडल्याचे सांगून तेथील डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केली.पंरतु मयत मंगलच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी राधानगरी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी करून पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी पती पांडुरंग याच्याकडे चौकशी केली असता प्रथम उडवाउडवी केली.त्याला पोलिसी खाक्क्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली.