प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - गोवा येथुन दिड लाख रुपये किंमतीची दारु आणि वापरात असलेली कार असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी हडलगे येथे कारवाई केली.कार चालक अविनाश सुभाष गावडे (रा.हडलगे) याला अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा येथून कोल्हापूर दिशेने कार येत असून त्यात गोवा बनावटीची दारु असल्याची माहिती मिळाली असता या विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी उपअधीक्षक युवराज शिंदे यांना माहिती दिल्याने गडहिग्लजचे निरिक्षक प्रमोद खरात,दुय्यम निरिक्षक दिवाकर वायंदडे,स्वप्निल पाटील,सहा.निरिक्षक संदिप जानकर ,प्रदिप गुरव ,भरत सावंत,स्वप्नाली बेडगे,संदिप चौगुले आणि अविनाश परीट यांनी त्या परिसरात सापळा रचून कार थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारु असलेलले चोवीस बॉक्स आढ़ळले.
या जप्त केलेल्या दारुची किमंत दिड लाख रुपये आणि वापरात असलेली कारची किमंत दोन लाख रुपये असा एकूण साडे तीन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कार चालकाकडे या बाबत विचारणा केली असता त्याने 31डिसे.च्या निमित्ताने कोल्हापुर जिल्हयात आणि शहरात विक्री साठी आणल्याची माहिती दिली.
या गोवा बनावटीची दारुच्या वाहतूकीत त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का त्या दृष्टिने तपास करीत आहेत.