प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंस्पुर्ली आणि मिरज पोलिस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणुन या प्रकरणी आरोपी गुरुदत्त शांतीनाथ पोळ (वय 43.बिजली चौक ,जवाहरनगर ) हरिश मधुकर पोळ (वय 38.रा.बी वार्ड ,जवाहरनगर) संजय मधुकर पोळ (वय 47.रा.जवाहरनगर ,सध्या रा.सुभाषनगर दिंडी वेश मिरज ) आणि स्वप्निल सुरेश सातपुते (वय 37.रा.क्रांतीचौक मंडळाजवळ ,यादवनगर ) यांना अटक करून त्यांच्या कडील साडेपाच लाख रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीतील चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने घरफोडी प्रकरणातील गुन्हयांची माहिती घेऊन तपास करीत असताना इस्पुर्ली पोलिस ठाण्यात घरफोडीचा दाखल असलेला गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेंगार गुरु पोळ याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केला असून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्याची विक्री करण्यासाठी कात्यायनी परिसरात असलेल्या मंदीर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी दि.30नोव्हेंबर रोजी कात्यायनी परिसरात मंदीराजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात त्यांच्याकडे घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने,मोटारसायकल,गुन्ह्यातील हत्यारे मिळुन आली.या बाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी इस्पुर्ली आणि मिरज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडील 32 ग्राम.वजनाचे सोन्याचे दागिने आणि 180 ग्राम.वजनाची चांदीचे दागिने असा एकूण साडे पाच लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील गुरुनाथ पोळ आणि स्वप्निल सातपुते हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात पोळ याच्यावर 50 गुन्हे दाखल आहेत.तर स्वप्निल याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत.या आरोपी कडुन इस्पुर्ली आणि मिरज पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणुन आरोपींना मुद्देमालासह इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस खंडेराव कोळी,संदीप पाटील,शिवानंद स्वामी यांच्यासह आदीने केली.