कंळबा जेल मधुन कैदी पळाला .

 

प्रेस मीडिया लाईव्ह: 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कंळबा जेल मधून पलायन केले.वजीर नानसिंग बारोला (वय 41.रा.फाळनेर जि.धुळे) असे त्या कैद्याचे नाव आहे.या घटनेने त्याच्या शोधासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत.या पलायन केलेल्या कैद्याच्या शोधासाठी कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.त्याच्या शोधासाठी बाजार पेठ,एसटी स्टँडचा परिसर सगळीकडे शोध घेतला पण तो पोलिसांना मिळुन आला नाही.       

कंळबा जेलच्या पोलिस यंत्रणेसह जुना राजवाडा पोलिसांनी सातारा ,सांगली ,उस्मानाबाद आणि सोलापूरसह धुळे आणि मध्यप्रदेश पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्याचे वर्णन आणि त्याची माहिती दिली.त्याच प्रमाणे रेल्वे पोलिसांना ही सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

यातील पलायन केलेला कैदी हा मुळचा मध्यप्रदेश येथील असून 2017 ला फाळनेर येथे झालेल्या  खुनाच्या घटनेत वजीर बारोला याला अटक झाली होती. 2018  ला त्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.त्याला नाशिक कारागृहात बंदी केले होते.18 जुलै 2024 रोजी त्याला नाशिक कारागृहातुन  कोल्हापूर येथे कंळबा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.एकूण शिक्षे पैकी पाच वर्षांचा कारावास भोगल्याने त्याला कारागृहात ओपन जेल मध्ये जनावरांच्या गोट्यात देखभालीची ड्युटी दिली होती.वजीर बारेला आणि त्याचा दुसरा सहकारी कैदी लहू विजय नाईक यांच्या समवेत शेताच्या         बांधावर पावणे बारा पर्यत काम करीत होते.त्यानंतर कैद्याने विजय नाईक यांला लघुशंकेसाठी   जात असल्याचे सांगितले.अंगावरील कपडे बदलून जनावरांच्या गोट्यात ठेऊन  त्याने शेतातुन पलायन केले.अर्धातास झाला तरी कैदी परत न आल्याने विजय नाईक यांनी कारागृह रक्षकांना याची माहिती दिली.

कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शोधाशोध चालू केली पण मिळुन न आल्याने कंळबा कारागृहातील पोलिसांनी कैद्याने पलायन केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके ,पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी कंळबा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी कारागृहाचा सारा परिसर पिंजून काढला कंदलगांव ,मोरेवाडी आणि शेंडापार्कासह सगळीकडे शोध घेतला पण तो पलायन केलेला कैदी सापडला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post