मोबाईल चोरट्यास अटक.

 

           


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापूर  - महाद्वाररोड येथे  मोबाईल चोरी करणाऱ्या सुरेश प्रकाश राजुळे (वय २८, रा. पिरपटेलवाडी, लातूर) याला  जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.  गुजरी कॉर्नर परिसरात  घडला होता. या चोरीची फिर्याद मनोहर प्रतापराव पाटील (वय ५०, रा. संभाजीनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती. 

फिर्यादी मनोहर पाटील हे गुजरी कॉर्नरला कपडे खरेदी करीत असताना  गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल चोरला. काही वेळात हा प्रकार त्यांच्या  लक्षात आल्याने पाटील यांनी  जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मोबाईल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. महाद्वार रोडवर वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या प्रकारांमुळे या गुन्ह्याचा तपास तत्काळ होण्यासाठी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन  तेथील सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयिताचा शोध घेत मध्यवर्ती बस स्थानकावरून संशयीतास  अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post