प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- हडलगे येथील भरत संतु पाटील (45) यांने आपल्या पोल्ट्री फार्म आणि चारचाकीत गोवा बनावटीची दारुचा साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असता या पथकातीने छापा टाकून 76 बॉक्स यात विविध कंपन्यांची दारु असा पाच लाख रुपये किमंतीचा दारुचा साठा आणि चारचाकी व इतर असा एकूण सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून भरत पाटील याला अटक केली.
नाताळ आणि 31डिसे.च्या निमित्ताने कोल्हापूर शहर आणि जिल्हयात होत असलेली दारुची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने तपासणी नाक्याबरोबर भरारी पथके कार्यरत आहेत.गडहिग्लज तालुक्यातील हडलगे येथील भरत पाटील यांने आपल्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्म मध्ये आणि चारचाकीत विविध कंपन्यांची दारुचा साठा करून ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.त्या नुसार या पथकाने कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक प्रमोद खरात,दुय्यम निरिक्षक दिवाकर वायंदडे स्वप्निल पाटील,सहा.दुय्यम निरीक्षक प्रदिप गुरव ,जवान जानकर ,चौगुले ,सावंत महिला जवान स्वप्नाली बेडगे आणि अविनाश पाटील यांनी केली.