नजरबाधा झाल्याचे भासवुन महिलेची फसवणुक करणा-या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात ,

 दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - क.बावडा येथे रहात असलेल्या जयबुन मनसुर मुश्रीफ (वय 48) या मारुती मंदीर जवळील पद्मा पथक चौक येथील लाइन बझार येथे रहात असलेल्या घरात जवळ कपडे धुत असताना दोघे अनोळखी इसम येऊन तुमच्या वर नजर बाधा झाली असून ती नजर काढ़ण्यासाठी माझ्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन तिकटीवर जाऊन नजर काढ़तो असे सांगून  सोन्याची चेन घेऊन गेले ते आज पर्यत परत न आल्याने त्या दोघांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला  फ़सवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. या अनुशंगाने तपास करीत असताना या गुन्हयांची तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीयरित्या माहिती घेत शाहुपुरी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याची गुन्हयांतील दोघां विधीग्रंस्त बालकांनी एका महिलेची सोन्याचे चेन फसवून नेल्याची माहिती मिळाली.यातील फसवणूक केलेले दोघे जण तावडे हॉटेल ते ताराराणी चौक मार्गावर असलेल्या शाहू सांकृतिक कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी (दि.24) रोजी छत्रपती शाहू सांस्कृतिक मंदीर जवळ असलेल्या कंपाऊंड येथे सापळा रचून त्या दोन विधीग्रंस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील सोन्याची चेन आणि गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल मिळुन आल्याने या बाबत त्या दोघांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फसवणूक केल्याची कबुली दिली दिल्याने त्यांच्या कडील सोन्याची चेन आणि मोटारसायकल असा एकूण दिड लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्या दोघांना शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेला फसवणूकीचा एक गुन्हा उघडकीस आणला .

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post