प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पणजी-गोवा येथील गोवा बुक ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा प्रत्येक वर्षी सन्मान करण्यात येतो.या वर्षीचा सामाजिक आणि कलाकार क्षेत्रातील पुरस्कारासाठी कोल्हापुरातील जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका सौ.गितांजली डोंबे यांची निवड करून त्यांना उपस्थित मान्यंवरांच्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार आर्ट आणि कल्च्लर डि.सांस्कृतिक भवन.पणजी -गोवा येथे 01 डिसे.24 रोजी प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार केंद्रीय कायदा मंत्री मा.रमाकांत खालप यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्राप्त पुरस्कारकर्त्यांना प्रदान करण्यात आला.या वेळी अंगणवाडीच्या सेविका बबीता पाडवी,जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर ,मा.प्रकाश वेळीप ,आ.रॉडल फर्नाडिस, अजय नाईक ,हेमंत कोळबकर ,दिनेश उघडे आणि या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एन.खरात सुनिलशेठ तसेच एकनाथ नार्वेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
सौ.डोंबे यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कामाची दखल त्यांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.