प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - आज कामास सुट्टी असल्याने मुला सोबत फुटबॉल खेळण्यास गेलेला महेश धर्मराज कांबळे ( वय 30.रा.निर्माण चौक , कोल्हापूर) याचा चक्कर आल्याने मृत्यु झाला.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत महेश हा एका खाजगी बँकेत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करीत होता.आज सुट्टी असल्यामुळे तेथील मुला समवेत रविवार (दि.15) रोजी दुपारी बाराच्या सुमारास कंळबा परिसरात असलेल्या टर्फ मैदानात फुटबॉल खेळण्यास गेला होता.तेथे त्याला अचानक धाप लागून चक्कर आल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार घेऊन घरी आला असताना त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यु झाला.या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या पश्च्यात वडील ,पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.